विजय चोरडिया…. सामान्यांसाठी झटणारा असामान्य माणूस

दातृत्त्वाचे धनी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर त्याआधी सामाजिक पाया मजबूत असणे गरजेचे आहे, असे संपूर्ण जगभरात म्हटले जाते. हाच वसा घेऊन वणीतील सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व परिसरात दातृत्वाचे धनी अशी ओळख असलेले विजय चोरडिया यांचे कार्य सुरु आहे. समाजकारण, धर्मिक कार्य असो की, राजकारण. माणूस हाच कामाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्याच्या कल्याणाकरिता कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अविरत कार्य करीत आहे. गेल्या 25 वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, धार्मिक, खेळ, कला, पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रांत विविध उपक्रम भव्य दिव्य पद्धतीने राबवले आहेत. वर्षभर सामाजिक उपक्रम सुरु असलेले ते वणी विधानसभा क्षेत्रातील एकमेव नेते.

समाजकारणासोबतच राजकारणातदेखील त्यांचा कळत नकळत प्रवेश झाला. एक कुशल संघटक अशी त्यांची पक्षात ओळख आहे. स्वच्छ आणि पारदर्शी कार्यावर त्यांचा कायम भर राहिलेला आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाल्यास कार्य अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. यामुळे गेल्या काही काळापासून त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रात त्या पद्धतीने कार्य सुरु केले आहे.

त्यांचे वडील स्व. पारसमल चोरडिया हे व्यावसायिक होते. त्यांच्या वडिलांचा सोने चांदी विक्रीचा व्यवसाय होता. त्यासोबत ते शेतकरी देखील होते. विजय चोरडिया यांचे प्राथमिक शिक्षण अमरावतीला झाले. माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचे शिक्षण वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन काळात ते विद्यार्थी चळवळीशी जुळले. युवा अवस्थेतच त्यांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाली. कॉलेजमध्ये असताना विद्यापिठाच्या निवडणुकीत भाग घेतला. इथूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. कॉलेज संपल्यानंतर उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असल्याने नागपूर येथून बी.फॉर्म. म्हणजेच औषधी निर्माण शास्त्र या विषयात त्यांनी पदवी घेतली. शिक्षणानंतर पुन्हा वणी गाठले. परंपरेने आलेला व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली.

25 वर्षाआधी समाजकार्याला सुरुवात
सन 2000 साली त्यांनी जेसीआय ही संघटना जॉईन केली. कार्याचा धडाका व उत्साह यामुळे 2002 साली जेसीआयचे अध्यक्षपद मिळाले. या काळात जेसीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वणी शहर व तालुक्यात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. 2003 साली सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. या काळात तरुणांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम राबवले. त्यामुळे अल्पावधीतच तरुण नेतृत्व म्हणून परिसरात ओळख मिळाली.

कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी
वणी परिसर हा कोळसा खाणीने समृद्ध आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कोल वॉशरीज आहेत. या कोल वॉशरीजमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी डावलण्यात येत होते. शिवाय कामगारांना दिला जाणारा मोबदला अत्यल्प होता. स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न व योग्य मोबदला हा विषय घेऊन कोल वॉशरीज विरोधात सातत्याने रास्ता रोको आंदोलन केले. अनेक मोर्चे काढलेत. यातील एका मोर्च्यात तर 5 हजारांपेक्षा अधिक कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. याचा परिणाम म्हणून शेकडो स्थानिकांना कोल वॉशरीत रोजगार मिळाला. तर इथे काम करणाऱ्या हजारो मजुरांना कामाचा योग्य मोबदला मिळाला.

आदिवासी समाजासाठी कार्य
वणी विधानसभा क्षेत्रातील अधिकाधिक भाग हा आदिवासी बहुल आहे. आर्थिक अडचण व गरीबी यामुळे अनेकांना उपचारांपासून वंचित राहावे लागत होते. ही गरज ओळखून त्यांनी आजपर्यंत अगणित आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. यातील शेकडो क्रिटीकल रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घेतली. तसेच त्यांच्या सहकार्याने हजारो गोरगरीब रुग्णांच्या डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले आहे. शेकडो अपंगांना व्हिलचेअर वाटप केले.

धार्मिक कार्यात अग्रेसर
वणी विधानसभा क्षेत्रात अनेक जुने आणि दुर्लक्षीत प्राचिन मंदिरे आहे. ही जिर्ण झालेली मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मदतीने अनेक मंदिराचा जिर्णोद्धार झाला व भाविकांची या दुर्लक्षीत मंदिरात रेलचेल सुरु झाली. याशिवाय संपूर्ण मतदारसंघात अनेक बुद्ध विहारांना मदत करण्यात आली. 2003 साली या जन्माष्टमी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. योगायोगाने त्यांचा जन्मदेखील जन्माष्टमीचा. नेतृत्व करण्याची संधी मिळताच संपूर्ण सप्ताह हा महोत्सव घेण्याचा निश्चय त्यांनी केला. आजही संपूर्ण आठवडा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या सप्ताहात असते. तर या महोत्सवाची सांगता भव्य दिव्य रॅलीने होते. सुमारे 10 हजार लोक आजही या रॅलीत सहभागी होतात.

शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य
हजारो होतकरू गरजू विद्यार्थ्यांना आजपर्यंत त्यांनी शिक्षणासाठी मदत केली. वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांत त्यांच्या मदतीने वाचनालय व अभ्यासिका सुरु झाल्यात. नगर पालिकेच्या शाळा दत्तक घेऊन या शाळेला व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. झरी हा आदिवासी बहुल तालुका असून येथे आरएसएसची नीड ही संस्था काम करते. या संस्थेच्या माध्यमातून या भागातील 611 आदिवासी विद्यार्थी त्यांनी दत्तक घेतले आहे.

विधानसभा क्षेत्रात सर्व स्तरातील, जाती-धर्मातील मतदार असतात. ही बाब लक्षात घेऊन जवळपास सर्वच क्षेत्रांतील उपक्रम गेल्या 25 वर्षांपासून सुरु आहेत. गोरगरीबांचे सामूहिक विवाह, शहरात झाडे लावणे, क्रीडाप्रेमींसाठी टी-10 या भव्य टुर्नामेंटचे आयोजन, शेतक-यांसाठी शंकरपटाचे आयोजन, कपडेवाटप, असे अगणित उपक्रम विधानसभा क्षेत्रात त्यांच्याद्वारे राबवले जाते.

विजय चोरडिया यांचे बलस्थान…

दांडगा जनसंपर्क
विजय चोरडिया हे गेल्या 25 वर्षांपासून राजकारण, समाजकारणात सक्रीय आहेत. या कालावधीत केवळ वणी तालुका नाही तर झरी आणि मारेगाव या तिन्ही तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम, राजकीय आंदोलन व मदतकार्य सुरु असते. या माध्यमातून त्यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढलेला आहे. प्रत्येक गावात पाटील, सरपंच, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, तरुणाई त्यांच्या संपर्कात आहेत. हाच जनसंपर्क त्यांचे बलस्थान आहेत.

अल्पसंख्यांक उमेदवार सरस
वणी विधानसभा मतदारसंघ कुणबी बहुल मतदार संघ म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या 35 वर्षांत या मतदारसंघात वर्चस्व मात्र अल्पसंख्याक उमेदवारांचे राहिले आहे. या काळात फक्त एकच संधी कुणबी उमेदवाराला मिळाली आहे. दर निवडणुकीत कुणबी मतांचे ध्रुवीकरणामुळे अल्पसंख्यांक उमेदवाराचा विजय निश्चित होते, असे एक समीकरण या मतदारसंघात बनले आहे. विजय चोरडिया हे अल्पसंख्यांक उमेदवारात सरस ठरतात.

मुस्लिम, दलित मतदार पाठिशी
विजय चोरडिया यांचे जाती धर्मासाठी सामाजिक उपक्रम सुरु असतात. मुस्लिम, दलित व आदिवासी समाजासाठी त्यांची नेहमी मदतीची भूमिका राहिली आहे. त्याचाच परिणाम म्हणून या या समाजातील कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्ष, उद्घाटक किंवा प्रमुख पाहुणे म्हणून मला सन्मान दिला जातो. याशिवाय या समाजातील अनेक युवक त्यांचे कार्यकर्ते, समर्थक म्हणून त्यांचे काम करतात.

तरुणांची फौज पाठिशी
त्यांच्या उपक्रमांमध्ये तरुणांचे उपक्रम अधिक असतात. त्यामुळे तरुणाईचा मोठा पाठिंबा त्यांच्या पाठिशी आहे. हिच तरुणाई विविध उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतात. आजही ही फौज फक्त एका हाकेवर त्यांच्या विविध कार्यासाठी धावून येतात. अशी फौज संपूर्ण मतदारसंघात आहे.

गेल्या 25 वर्षांचे परीश्रम, जनसंपर्क, मदत, सर्व क्षेत्रातील उपक्रम, स्वच्छ प्रतिमा, युवकांमध्ये लोकप्रियता, विकासाचे व्हिजन, सर्व जाती धर्मात चांगली प्रतिमा यामुळे विजय चोरडिया हे एक प्रभावी उमेदवार ठरू शकतात. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.