वणीतील युवकांनी राबविला एक वेगळा उपक्रम

प्रभू श्री विश्वकर्मा जयंती निमित्त गांधी चौकात न्याहरी वाटप

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात नुकतीच प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रम झालेत. त्याचाच एक भाग म्हणून सुतार समाज मित्रपरिवार ग्रुपद्वारा गांधी चौकात एक उपक्रम झाला. त्या अंतर्गत शोभयात्रेत सहभागी आणि अन्य नागरिकांना न्याहरीत बटाटावड्याचे वितरण करण्यात आले.

याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यात महेश राखुंडे, किशोर बुरडकर, तोशील झिलपे, गणेश कायरकर, सुनील गहुकार, अजिंक्य गहुकर, शुभम जयपूरकर, सुहास झिलपे, राहुल वांढरे, गणेश निवलकर, चंदू वनकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed.