कारागिर व युवक मार्गदर्शन मेळावा

अखिल भारतीय विश्वकर्मा समाज विकास मंडळाचे आयोजन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: अखिल भारतीय विश्वकर्मा समाज विकास मंडळ नागपूर द्वारा कारागीर व युवक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड (भटके विमुक्त, बारा बलुतेदार,अतिपिछड़ा सेवा संघ), दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकरजी कोहळे, ओबीसी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रो.नागोजीराव पांचळ, वणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ता तथा ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश ढुमणे व मान्यवर उपस्थित होते.

Podar School 2025

आमदार हरिभाऊ राठोड यांनी आरक्षण या विषयावर आपले मत मांडले. आरक्षणाच्या अनेक बाजूंवर त्यांना आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. आमदार कोहळे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. उपस्थितांनी या योजनांचा लाभ घेण्याचेही आवाहन त्यांनी केले. नागोजीराव पांचाळ यांनी विश्वकर्मा समाज क्रांती व विकास या विषयावर भाष्य केले. उमेश ढुमणे यांनी आजचा युवा या विषयार उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी समाजातील काही युवकांचा सत्कार करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.