रविवारी राजूर–चिखलगाव सर्कलमध्ये काँग्रेसची भव्य रॅली

वणी तालुका काँग्रेसतर्फे ‘वोट बचाओ–देश बचाओ’ अभियान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी तसेच मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘वोट बचाओ–देश बचाओ’ अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाचा शुभारंभ रविवार, 29 नोव्हेंबर रोजी राजूर–चिखलगाव सर्कलमधून होणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार आणि जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत विविध गावांमध्ये भेटी देऊन लोकशाही मूल्ये, संविधानाचे महत्त्व आणि मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

अभियानाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून गणेशपूर येथे सकाळी 8:30 वाजता, विरकांगाव येथे 9 वाजता, निंबाळा–सोमणाळा येथे 9:30 वाजता, पळसोनी येथे 10 वाजता, तर राजूर येथे सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार आहे. अभियानात वणी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, विविध सेल व मंडळांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘वोट बचाओ–देश बचाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत जाऊन नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे. – विकेश पानघाटे, तालुका अध्यक्ष काँग्रेस

लोकशाही वाचविण्यासाठी, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि जनजागृतीचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश पानघाटे यांनी केले आहे.

Comments are closed.