पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील महालक्ष्मी सुपर अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शहराचा गौरव वाढविला आहे. संभाजीनगर येथील मुख्य केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल ऑनलाइन चॅम्पियनशीपमध्ये वणी केंद्रातील एकूण 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 8 विद्यार्थ्यांनी विविध लेव्हलमध्ये अवॉर्ड मिळवत विशेष कामगिरी नोंदवली.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फलित त्यांच्या निकालातून दिसून आले. लेव्हल 0 मध्ये दिया मडावी हिने 100 पैकी 100 गुण मिळवत ‘मोटिवेशनल अवॉर्ड’ पटकावला. लेव्हल 2 मध्ये अन्वी गोरंटीवार हिने 95 गुणांसह 5 वा क्रमांक मिळविला. लेव्हल 1-C मध्ये पार्थ अटारा याने 99 गुणांसह 3 रा क्रमांक पटकावला, तर लेव्हल 1-B मध्ये प्रिनल धडसे हिला 98 गुणांसह ‘मोटिवेशनल अवॉर्ड’ मिळाला. लेव्हल 1 मध्ये मयंक बरेवार याने 100 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत केंद्राचा मान उंचावला. याच लेव्हलमध्ये नकुल राखुंडे याने 98 गुणांसह 5 वा क्रमांक मिळविला.
लेव्हल 1-A मध्ये पृथा कुत्तरमारे हिने 99 गुणांसह 5 वा क्रमांक पटकावला. तसेच लेव्हल 1 मध्ये अर्णव कुलकर्णी याला 99 गुणांसह ‘मोटिवेशनल अवॉर्ड’ प्राप्त झाला. या यशामागे केंद्राच्या संचालिका एकता नालमवार आणि दिव्या गोरंटीवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला योग्य दिशा मिळाली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक व परिसरातून त्यांचे कौतुक होत असून, वणी शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात या कामगिरीमुळे अभिमानाची भर पडली आहे.




Comments are closed.