माळी समाजाची धार्मिक सहल जाहीर; 24 तीर्थक्षेत्रांचे दर्शन

15 मे ते 22 मे दरम्यान यात्रा; वणीहून प्रवास, अॅडव्हान्स बुकिंग सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील माळी समाजाच्या वतीने भाविकांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले असून, अल्प खर्चात महाराष्ट्रातील विविध प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. ही यात्रा 15 मे 2026 ते 22 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, एकूण 7 ते 8 दिवसांचा प्रवास राहणार आहे. या सहलीमध्ये औरंगाबाद, परळी वैजनाथ, गंगाखेड, अंबेजोगाई, बार्शी, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, अरण, गोंदवले, शिखर शिंगणापूर, मोरगाव, जेजुरी, तिरुपती बालाजी मंदिर, नायगाव, पुणे, आळंदी, देहू, शिर्डी, शनि शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, खंडोबा मंदिर यांसह एकूण 24 धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

या यात्रेसाठी प्रति व्यक्ती प्रवास भाडे 4,500 रुपये निश्चित करण्यात आले असून, अॅडव्हान्स बुकिंगसाठी 3,000 रुपये ठेवण्यात आले आहे. प्रवासादरम्यान राहण्याची व्यवस्था धर्मशाळा व मंदिरांमध्ये करण्यात येणार असून, जेवणाची व्यवस्था प्रवाशांनी स्वतः करावयाची आहे. यात्रेची सुरुवात 15 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वणी बस स्थानक परिसरातील श्री गणपती दर्शनाने होणार आहे. यात्रेदरम्यान प्रवाशांनी आवश्यक कागदपत्रे, औषधे तसेच वैयक्तिक साहित्य सोबत बाळगण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या सहलीसाठी माळी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी उषाताई वि. लेनगुळे, वणी – 7385609870, भास्कर वाढई, वणी – 9922861476, अजय वि. सोनेले, वणी – 9922603332 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Comments are closed.