वणी बाजार समितीमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर संपन्न

अडते, व्यापारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित

0

विवेक तोटेवार, वणी: कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार अधिकाधिक स्पष्ट व्हावे म्हणून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून वणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता बाजार समितीचे सर्व व्यवहार ऑनलाइन कऱण्यात आले.

ऑनलाइन व्यवहाराबाबत अनेकांना माहिती नाही. याबाबत माहिती मिळावी म्हणून 24 ऑगस्ट गुरूवारला शेतकरी, व्यापारी, अडते व कर्मचारी यांच्याकरिता कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये केंद्र शासनाचे सेवा पुरवठादार संस्थेचे प्रतिनिधी जयपाल बनसोडे तसेच मंडी अनालिस्ट अश्विन नागेलवार यांनी मार्गदर्शन केले.

(स्वार्थी दुनियेत आला कृष्णा-सुदामा मैत्रीचा प्रत्यय)

यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकार, सदस्य सतीश बडगरे, प्रमोद मिलमीले, प्रेमानंद धानोरकर, दयालाल अरके, गणपत रासेकर, तेजराज बोडे, जीवन झाडे, सहायक निबंधक बी.जी.जाधव, सचिव अशोक झाडे, तसेच प्रशिक्षनासाठी अडते, व्यापारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.