वणीकरांची नगराध्यक्ष म्हणून तारेंद्र बोर्डे यांनाच पसंती… ‘वणी बहुगुणी’चा ओपिनियन पोल

दुस-या क्रमांकावर काँग्रेसचे इजहार शेख लोकप्रिय... सेनेचे राजू तुराणकर यांना तिस-या क्रमांकावर पसंती

वणी बहुगुणी डेस्क: सध्या नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या काळाचा लेखाजोखा घेण्यासाठी, तसेच वणीकरांची नगराध्यक्ष पदाबाबत पसंती जाणून घेण्यासाठी काही दिवसांआधी ‘वणी बहुगुणी’ने एक ओपिनियन पोल घेतला होता. यात अधिकाधिक वणीकरांनी तारेंद्र बोर्डे यांच्या नावाला नगराध्यक्ष म्हणून पसंती दिली आहे. दुस-या क्रमांकावर काँग्रेसच्या इजहार शेख यांना पसंती मिळाली आहे. तर तिस-या क्रमांकावर शिवसेनेचे राजू तुराणकर यांना नगराध्यक्ष म्हणून पसंती दिली आहे.

‘वणी बहुगुणी’ने वणी नगर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून तुमची कुणाला पसंती असेल? हा प्रश्न घेऊन सोशल मीडियावरून वणीकरांचे पोलद्वारा ओपिनियन घेण्यात आले होते. यात भाजपचे तारेंद्र बोर्डे, काँग्रेसचे इजहार शेख, शिवसेनेचे राजू तुराणकर, मनसेचे धनंजय त्रंबके, शिवसेनेचे विक्रांत चचडा, वंचित बहुजन आघाडीचे भारत कुमरे, भाजपचे रवि बेलूरकर व यापैकी नाही असे पर्याय होते.

यात 46 टक्के लोकांची नगराध्यक्ष म्हणून तारेंद्र बोर्डे यांना पसंती दिली. तर 22 टक्के लोकांची इजहार शेख यांना पसंती दिली. 11 टक्के नागरिकांनी राजू तुराणकर यांना पसंती दिली आहे. तर इतर व यापैकी नाही यांना 21 टक्के लोकांनी पसंती दिली.

नगराध्यक्ष म्हणून तारेंद्र बोर्डे यांची लोकप्रियता कायम
या पोलमध्ये तरुणांमध्ये नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची क्रेज दिसून आली. ओपिनियन देताना अनेकांनी पक्ष ऐवजी विकास कामांना प्राधान्य दिले. गेल्या 5 पाच वर्षातील विकास कामाचा ग्राफ हा इतर पंचवार्षिक पेक्षा अधिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे वैचारिक विरोधक असणारे व इतर पक्षाचे समर्थक असणा-या अनेकांनीही पक्षभेद विसरून तारेंद्र बोर्डे यांच्या नावाला पसंती दिली आहे.

लवकरच वणी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. ओपिनियन पोलमध्ये विकासकामांसाठी भाजपला पसंती असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे केवळ एकाच भागाचा विकास झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तसेच भाजपची केंद्रात, राज्यात सत्ता (फडणवीस सरकार) व खासदार (हंसराज अहिर), आमदार आणि नगराध्यक्ष असे एकाच पक्षाचे (भाजप) असल्याने विकासकामांना गती मिळाली. मात्र आता भाजपची खासदारकी, राज्यात गेलेली सत्ता या कारणामुळे विकास कामांना ब्रेक मिळाल्याचा दावा विरोधकांचा आहे. भाजपला काँग्रेस आणि सेनेचे आव्हान राहणार आहे. त्यामुळे येणा-या निवडणुकीत विरोधक असलेले काँग्रेस, सेना व इतर पक्षांना चांगलाच घाम गाळावा लागणार असल्याचे दिसत आहे.

आपल्यालाही या ओपिनियन पोलमध्ये सहभाग घेता येऊ शकतो. याची लिंक खाली दिलेली आहे. 

https://m.facebook.com/questions.php?question_id=1293366634518080

हे देखील वाचा:

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

संतापजनक… 5 वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.