वणीत भाजपचे दोन दिवसीय प्रशिक्षण; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

2 दिवसांत 7 सत्रांचे आयोजन; तज्ज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026’ अंतर्गत वणी शहर मंडलाचा दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. स्थानिक वसंत जिनींग हॉल येथे आयोजित या शिबिरात शहरातील 105 कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली वैचारिक, राजकीय आणि सामाजिक क्षमता अधिक सक्षम केली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष विद्या आत्राम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून त्याला वैचारिकदृष्ट्या सक्षम करणे आणि सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.

Birthday

दोन दिवसांच्या या शिबिरात एकूण 7 सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी ‘आपला इतिहास आणि विकास’ या विषयावर प्रफुल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, तर अध्यक्षपद संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भूषवले. पुढील सत्रात श्रीराम मेल्केवार यांनी कार्यपद्धती व कार्यकर्ता व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. त्यानंतर कैलास बोंद्रे यांनी कार्यविस्ताराची दृष्टी स्पष्ट केली.

दुसऱ्या दिवशी डॉ. नितीन खर्चे यांनी वैचारिक अधिष्ठान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. पुढील सत्रात राजू पडगीलवार यांनी सोशल मीडिया, एआय, नमो व सरल ॲप यांसारख्या आधुनिक विषयांची माहिती दिली. शंतनु शेटे यांनी सरकारच्या कामगिरीवर भाष्य केले, तर अंतिम सत्रात गजानन भोकारे यांनी बूथ व्यवस्थापन व ‘मन की बात’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डिजिटल युगाशी सुसंगत राहण्यासाठी प्रशिक्षणाच्या शेवटी कार्यकर्त्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या कार्यकर्त्यांना डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिरादरम्यान पहाटे योगासन सत्र आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने उत्साही वातावरण निर्माण झाले.

या प्रशिक्षण महाअभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी वणी शहर मंडळ अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, सरचिटणीस तथा संयोजक आशिष डंभारे आणि संपूर्ण भाजप टीमने विशेष परिश्रम घेतले. या शिबिरातून मिळालेल्या वैचारिक शिदोरीच्या जोरावर कार्यकर्ते ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार घेऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Comments are closed.