अखेर पाच दिवसानंतर बोर्डा बसफेरी सुरु, मनसेचा पुढाकार

मारहाणीच्या घटनेनंतर बंद असलेली सेवा पुन्हा सुरु, विद्यार्थ्यांना दिलासा

बहुगुणी डेस्क, वणी: अखेर पाच दिवसानंतर आज सकाळपासून वणी ते बोर्डा व्हाया विरकुंड व घोन्सा या बसफे-या सुरु झाल्या आहेत. सोमवारी याबाबत विद्यार्थ्यांनी मनसेला सोबत घेत एसटी डेपो कार्यलयात धडक दिली होती. विद्यार्थ्यांनी त्यांची समस्या आगार प्रमुखांना समजावून सांगितली होती. त्यानंतर आज ही बसफेरी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनसेचे शहर प्रमुख अंकुश बोढे यांचे आभार मानले. सराव परीक्षा सुरु झाल्याने बसफेरी सुरु होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शुक्रवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी बोर्डा येथे विद्यार्थ्याला आणायला गेलेल्या बसचालकाला बोर्डा येथील एकाने मारहाण केली होती. या घटनेपासून बोर्डा येथील बससेवा बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. त्यातच सराव परीक्षेला सुरुवात झाली. त्यामुळे आज सोमवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी मनसेचे शहर अध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्त्वात एसटी डेपो कार्यालयात धडक दिली होती.  बोर्डा येथून इयत्ता 5 ते 12 पर्यंतचे सुमारे 100 विद्यार्थी रोज वणी येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. तसेच गावातील अनेक गोरगरीब लोकांसाठी एसटी बसच वणीला ये-जासाठीचा पर्याय आहे.

आगार प्रमुखांचे आभार– अंकुश बोढे
मारहाणीच्या घटनेत विद्यार्थी व सर्वसामान्य गावक-यांचा कोणताही संबंध नव्हता. ही बाब आम्ही आगार प्रमुखांना समजावून सांगितली. बस सुरु करण्याबाबत आगार प्रमुखांशी सकारात्मक चर्चा झाली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आगार प्रमुखांनी बसफेरी सुरु केल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. यापुढेही विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रश्नांवर मनसे कोणतीही तडजोड करणार नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बोर्डा येथील वैशाली मुसळे, पूनम ढेंगळे, ज्योत्स्ना बलकी, रुपाली खाडे, विद्या खाडे, वंदना हेपट, शुभांगी डोंगरकर, सुषमा डोंगरकर, सुनीता ठाकरे यांच्यासह बोर्डा येथील शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मनसेचे आभार मानले.

Comments are closed.