शिवसेनेची (शिंदे) दमदार रॅली, महिला, तरुणांचा सहभाग लक्षवेधी

पालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार - विजय चोरडिया

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी रॅलीचा दिवस ठरला. शिवसेनेने (शिंदे) सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पायल तोडसाम व नगरसेवकांचे नामांकन अर्ज दाखल करून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत विशेषतः महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीत युवावर्ग ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. या रॅलीचे नेतृत्व माजी आमदार विश्वास नांदेकार, जिल्हा संघटक विजय चोरडिया, विनोद मोहीतकर यांनी केले.

शिंदेसेनेच्या रॅलीची सुरुवात श्री रंगनाथ स्वामी देवस्थानातून झाली. तेथून चंद्रशेखर आजाद चौक, नटरात चौक, खाती चौक, टिळक चौक या मार्गे पुढे जात ही रॅली जैताई मंदिरात पोहोचली. रॅलीची सांगता तहसिल कार्यालयाजवळ झाली. यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले.

पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार – विजय चोरडिया
शिवसेनेकडे स्टाँग व अनुभवी उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे शिवसेना (शिंदे गट) नगरपालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित करेल. त्यांच्या परिश्रमातून यंदा पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांचा उत्साह, महिलांचा मोठा सहभाग आणि युवावर्गाची साथ यामुळे आमचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. – विजय चोरडिया, जिल्हा संघटक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दमदार रॅलीमुळे शिवसेना शिंदे गटात नवचैतन्य आले आहे. रॅलीत जिल्हा समन्वयक हरिहर लिंगनवार, शिवराज पेचे, विक्रांत चचडा, शुभम गोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.