शोधले 13 हरवलेले मोबाईल, पोलिसांची मोठी कामगिरी

मोबाईल मालकांना दिलासा, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलीस स्टेशनमध्ये विविध तक्रारदारांनी आपले मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींवर त्वरित कारवाई करत, वणी पोलीस स्टेशनच्या सायबर विभागातील महिला पोलीस अंमलदार छाया उमरे यांनी CEIR पोर्टलचा वापर करून तांत्रिक तपास सुरू केला. त्यांच्या बारकाईने आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे एकूण 13 हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात यश मिळाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गुरुवारी दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी, हे सर्व मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसला, तर वणी पोलिसांच्या दक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सदरची कारवाई ठाणेदार वणी यांच्या मार्गदर्शनाखाली छाया उमरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. नागरिकांमध्ये वणी पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.