वणीमध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी काठी, वॉकर, व्हीलचेअर नि:शुल्क

स्माईल फाउंडेशनचा उपक्रम — नवीन वर्षांनिमित्त आधार, आशा आणि आनंदाची भेट

भूषण आदे, वणी: नवीन वर्षाच्या स्वागताला सामाजिक बांधिलकीची जोड देत स्माईल फाउंडेशन, वणी या संस्थेने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी मोफत सहाय्य उपक्रमाची सुरुवात केली आहे. समाजोपयोगी आणि सकारात्मक कार्यांची मालिका सुरू ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, गरजू नागरिकांना काठी, चालण्यासाठी वॉकर, व्हीलचेअर तसेच व्हीलचेअर दुरुस्ती सेवा पूर्णतः नि:शुल्क उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात स्माईल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी 7038204209 / 8484031777 या क्रमांकांवर संपर्क साधावा लागणार आहे.

स्माईल फाउंडेशन ही संस्था 12A, 80G व CSR-1 नोंदणीकृत असून आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. “नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प व नवीन सुरुवात” या भावनेतून स्माईल फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हा संस्थेचा मुख्य हेतू असल्याची माहिती संस्थेने दिली.

वृद्ध व दिव्यांगाना आधार देण्याचा प्रयत्न
नवीन वर्षाच्या सुरुवातीला समाजातील दुर्बल घटकांसाठी काहीतरी सकारात्मक देण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचा आधार आणि ज्येष्ठ नागरिकांना काठीचा आधार देत त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणणे हीच आमची खरी प्रेरणा असून ही सेवा वर्षभर अखंडपणे सुरू राहणार आहे.”

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या उपक्रमामुळे वणी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना केवळ सहाय्यच नव्हे तर नव्या वर्षाची आशा, आधार आणि आनंदाची भेट मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक कार्यांची मालिका अखंडपणे सुरू राहणार – सागर जाधव, संस्थापक अध्यक्ष स्माईल फाउंडेशन

या उपक्रमामुळे वणी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना केवळ सहाय्यच नव्हे तर नव्या वर्षाची आशा, आधार आणि आनंदाची भेट मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक कार्यांची मालिका अखंडपणे सुरू राहणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.