विदर्भ आयडॉलच्या पहिला राउंड उत्साहात, 83 स्पर्धकांचा सहभाग
20 स्पर्धकांना दुस-या राउंडमध्ये प्रवेश... कोण झालेत सिलेक्ट?
बहुगुणी डेस्क, वणी: गुरुवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी स्वरधारा विदर्भ आयडॉलचा ऑडिशन राऊंड (पहिला राऊंड) पार पडला. वणीतील छत्रपति शिवाजी महाराज उद्यान येथे ही निवड चाचणी झाली. यात 83 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात ज्युनियर व सिनियर असा दोन गटातील प्रत्येकी 10 स्पर्धकांची दुस-या (मुख्य) राउंडसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मांडवी येथील उमेश ताटेवार व नागपूर येथील दीपिका ढवस यांनी परीक्षण केले. रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत विदर्भातील उर्वरीत तालुक्यातील स्पर्धकांची ऑडिशन वरोरा रोडवरील बाजोरिया लॉन येथे होणार आहे.
कोण झालेत दुस-या राउंडसाठी सिलेक्ट?
ज्युनियर गृप– ओजस्वी श्रीवास्तव, चैत्रवी ठाकरे, अनन्या टोंगे, राधा कुचनकर, रिशिता चव्हाण, रिधीमा शेजळ, तन्मय दंतुलवार, त्रिशा वनकर, विधी निकोडे, युती पांडे
सिनियर गृप – गरीमा शेजळ, ध्रुव निखाडे, श्रीकांत आसुटकर, प्रदीप जगताप, शर्वरी बावीस्कर, श्रद्धा लांबट, मनोज धांडे, अदिती पुडके, प्रतिक काकडे, प्रणाली उईके
श्री साई म्युझिकल गृप, श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र, मैत्रेय फाउंडेशनतर्फे व स्व. पंडीत रामगोपालजी जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ या विदर्भ आयडॉल या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संतोष जोशी 9370673050, अजित खंदारे 9130175687 व दिगांबर ठाकरे 8805925758 यांना संपर्क साधता येणार आहे.
रविवारी होणा-या मुख्य स्पर्धेला मुंबई येथील इंडियन आयडॉल (2024) फेम उत्कर्ष वानखेडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संध्याकाळी 7 वाजता उत्कर्ष वानखेडे यांचा गीत गायनाच्या कार्यक्रमाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीकरांनी हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Comments are closed.