बहुगुणी डेस्क, वणी: सावर्ला येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या महसूलच्या कर्मचा-याच्या कारची काच दोन माथेफिरूंनी फोडली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सध्या पोलीस या दोन समाजकंठकांचा कसून शोध घेत आहे. सध्या वणीत काच कुणी फोडली याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
तक्रारीनुसार, कुणाल निळकंठ आडे (35) हे वणीतील विठ्ठलवाडी येथे रहिवासी असून ते सावर्ला येथे तलाठी आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते येथे कार्यरत आहे. त्यांच्याकडे टाटा पंच ही कार आहे. सदर कार ते भाडे तत्त्वाने देतात. भाडे नसले की त्यांची कार घरासमोर लावलेली असते. शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री नेहमी प्रमाणे जेवणानंतर झोपले होते. रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ते उठले असता त्यांना त्यांच्या कारच्या काच फुटलेल्या आढळल्या.
सीसीटीव्हीतून झाला उलगडा
त्यांच्या शेजारी असलेल्या एका व्यक्तीच्या घरी सीसीटीव्ही बसवलेले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही चेक केले असता त्यांना रात्री पावने दोन वाजताच्या सुमारास दोन तरुण दुचाकीने आलेले दिसले. ते सोबत दगड घेऊन आले होते. त्यातील मागे बसलेल्या एकाने गाडीच्या समोरील काचावर व समोरील पॅसेंजर साईडच्या काचावर दगड मारले.
या घटनेत आडे यांच्या कारचे सुमारे 30 हजारांचे नुकसान झाले आहेत. त्यांनी तातडीने वणी पोलीस ठाणे गाठले व याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात बीएनएसच्या कलम 125 324(2) 329(3) 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर येताच कार कुणी फोडली याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या पोलीस दहशत पसरवणा-या दोघांचा कसून शोध घेत आहे.
आणखी एक धाडसी घरफोडी, चार लाखांपेक्षा अधिकच्या दागिन्यांवर डल्ला
Comments are closed.