आंतरजातीय विवाह केलेल्या महिलेला हुंड्यासाठी त्रास, पाच जणांवर गुन्हा

गॅरेज टाकण्यासाठी 1 लाखांची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: आंतरजातीय विवाहानंतर 30 वर्षीय महिलेला सासरकडून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागला. गॅरेज सुरु करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी पूर्ण न केल्याने तिला माहेरी सोडण्यात आले. या प्रकरणी वणी पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी महिला (30) ही वणीतील शास्त्रीनगर येथील रहिवासी आहे. तिचा विवाह 2022 मध्ये आष्टी, जि. वर्धा येथील अनमोल गोटाळे (30) यांच्याशी झाला. सुरुवातीला तिला सासरी चांगली वागणूक मिळाली, परंतु लवकरच पतीने गॅरेजसाठी 1 लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली. पैसे न आणल्यास नांदवणार नाही, अशी धमकी तिला सासरकडून मिळत होती. सासू-सासरे हुंडा न मिळाल्याचा टोमणा मारत त्रास देत होते आणि पतीचे दुसरे लग्न करण्याची धमकी देत होते.

महिलेने आपले वडील गरीब असल्याने पैसे आणणे शक्य नसल्याचे सांगितले. यामुळे पती तिला मारहाण करायचा. 2022 मध्ये दिवाळीच्या वेळी सासरच्या मंडळींनी फिर्यादीला पैसे आणण्यासाठी माहेरी वणी येथे पाठवले. तसेच पैसे घेऊन आली तरच घरी परत ये, अन्यथा घरात घेणार नाही, असा दम देखील दिला. फिर्यादीला सासरच्या मंडळीनी माहेरी सोडले व त्यानंतर ते तिला परत घेण्याकरीता कधीही आले नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सासरचे मंडळी सासरी नांदवायला नेत नसल्याने तिने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पती व पत्नीत कोणाताही समेट न घडल्याने पोलिसांनी महिलेचे पती, सासू, सासरे, दोन दिर अशा 5 जणांवर भादंविच्या कलम 498 (अ), 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

धक्कादायक – सेवाभावी शिक्षक दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन

Comments are closed.