गोंडबुरांडा येथे जागतिक कापूस दिन साजरा

बी.सी.आय.चा पुढाकार, शेतक-यांना करण्यात आले मार्गदर्शन

भास्कर राऊत, मारेगाव: कापूस पिकांवर होणारा खर्च कमी करून उपजीविका वाढविणे. पर्यावरणाचा होणारा दुष्परिणाम कमी करून पिकांसाठी रासायनिक घटक कमी वापरणे आणि प्रशिक्षणातून सामाजिक बदल घडविणे या उद्देशाने तालुक्यातील बुरांडा येथे दि. 7 सप्टेंबरला जागतिक कापूस दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच चरणदासजी रामपुरे ,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेमानंद दानखडे, पवन दानखडे, घनश्याम दानखडे आणि विनोद खोके उपस्थित होते.

मारेगाव आणि वणी तालुक्यातील 37 गावांमध्ये उत्तम कापूस यंत्रणा (बी.सी.आय.) हा प्रकल्प सुरू आहे. कॉटन कनेक्ट साऊथ एशिया प्रा. लिमिटेड ही कंपनी यांची अंमलबजावणी करते. तर स्थानिक पातळीवर विकास गंगा समाजसेवी संस्था पांढुर्णा ही संस्था हे प्रकल्प राबवीत असते. ही संस्था 7 तत्व आणि 29 निकष लागु करून सुधारित कापूस उत्पादक शेतकरी आणि मजुरवर्ग यांना शाश्वत शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि सभ्य कामाच्या कार्यपद्धतीवर प्रशिक्षण देऊन उत्तम कापूस घेण्यास प्रोत्साहित करण्यात येत असते.

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भगत, प्रास्ताविक कु.स्नेहल चिमुरकर आणि आभार प्रदर्शन नितीन वाढई यांनी केले. कार्यक्रमाला गावातील बी. सी.. आय. शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

हे देखील वाचा:

मारेगाव तालुक्यात कापसाच्या खेडा खरेदीला आलाय ऊत

बारसमोर मद्यधुंद अवस्थेत मित्रांचा राडा, मारहाणीत एकाचा मृत्यू

Comments are closed.