WPL चे थाटात उद्घाटन…. 11 टायगर्स रोअरिंगची विजयी सलामी

श्रीराम वॉरिअर्सची धडाकेबाज सुरूवात.., तौसिफ खान याने अवघ्या 17 बॉलमध्ये 49 रन्सची धडाकेबाज खेळी

विवेक तोटेवार, वणी: प्रेक्षकांच्या एकच जल्लोषात, खचाखच भरलेल्या मैदानात शनिवारी संध्याकाळी शहरातील शासकीय मैदानावर WPL या स्थानिक क्रिकेट तुर्नामेंटचे थाटात उद्घाटन झाले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर लगेच टायगर रोअरिंग विरुद्ध संजय वारिअर्स यांच्यात उद्घाटन पर सामना खेळला गेला. पहिल्या दिवशी तीन सामने खेळले गेले. सलामीच्या सामन्यात रोअरिंग टायगरने संजय वारिअर्सवर धडाकेबाज विजय मिळवला.

शनिवार 11 डिसेंबर रोजी इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब द्वारा आयोजित WPL तुर्नामेंटला सुरूवात झाली. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पार पडले, यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे होते तर विजय चोरडिया, ठाणेदार श्याम सोनटक्के, एमएसईबीचे सहाय्यक अभियंता सुदर्शन इवनाते, मोहमद अब्दुल कदिर, रवि बेलूरकर, डॉ. विकास हेडाऊ यांची प्रमुख उपस्थिती होती.

11 टायगर रोअरिंगची संजय वॉरिअर्सवर मात
उद्घाटनानंतर पहिल्या सामन्याला सुरवात झाली. प्रथम सामना हा 11 टायगर रोअरिंग विरुद्ध संजय वारीअर्स यांच्यात खेळला गेला. पहिल्या सामन्यात रोअरिंग टायगर या संघाने प्रथम फलंदाजी करीत 8 षटकात 74 धावा काढल्या. धावांचा पाठलाग करताना संजय वारिअर्सचा संपूर्ण संघ 7.5 षटकात सर्वबाद 58 धावात गारद झाला. दोन ओवर्समध्ये 6 रन्स देत 4 गडी बाद करणारा लखन आत्राम हा सामनावीर ठरला. कार्तिक देवडे याने 24 बॉल्समधे 33 रन्स काढले. 

श्रीराम वॉरिअर्सची धडाकेबाज विजयी सुरूवात
दुसरा सामना हा पीपीजेएस गोल्डन विरुद्ध श्री राम वॉरिअर्स यांच्यात झाला. यात पीपीजेएस गोल्डन संघाने 8 षटकात 4 खेळाडू गमावून 70 रन्स केलेत. श्रीराम वॉरिअर्सने 71 रन्सचा पाठलाग करीत अवघ्या 6.3 ओव्हर्समध्ये 2 गडी गमावून 75 रन्स काढले. 8 गडी राखून श्रीराम वॉरिअर्सने या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात तौसिफ खान याने अवघ्या 17 बॉलमध्ये 49 रन्सची धडाकेबाज खेळी केली. उमेश बोर्डे यांने 23 रन्स देत 2 गडी बाद केले. तौसिफ खान याला सामनावीर घोषीत करण्यात आले.

ब्ल्यू पँथर्सचा आमेर नाईट रायडर्सवर सहज विजय
तिसरा सामना हा आमेर नाईट रायडर्स व ब्ल्यू पॅंथर यांच्यात खेळला गेला. आमेर पँथर टिमने 8 षटकात 7 गडी गमावून 55 धावा काढल्या. 56 धावांचा पाठलाग करताना ब्ल्यू पँथर टीमने 6 षटकात 2 खेळाडू गमावून 56 धावा काढत सामना सहजरित्या खिशात घातला. या सामन्यात अमित काकडे याने 22 बॉल्समध्ये 31 रन्स काढले. तर स्वप्निल मोहितकर याने 13 धावा देत 2 गडी बाद केले. स्वप्निल मोहितकर याला सामनावीर घोषीत करण्यात आले.

आज सोमवारी होणारे सामने…
सकाळी 9.30 वाजता आमेर नाईट रायडर्स विरुद्ध पीपीजेस गोल्डन इलेव्हन
दु. 11.45 वाजता जेएमसीसी वणी विरुद्ध संजय वॉरिअर्स
दु. 1.30 वाजता ब्लू पॅन्थर विरुद्ध राजपूत रॉयल्स
दु. 3.10 वा. 11 टायगर रोअरिंग विरुद्ध ए ब्लास्टर
सं. 5 वाजता किंग्स 11 वणी विरुद्ध श्रीराम वॉरिअर्स
सं. 7 वाजता जेएमएमसी वणी विरुद्ध पीपीजेस गोल्डन इलेव्हन
रात्री. 9 वाजता आमेर नाईट रायडर्स विरुद्ध राजपूर रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे.

या लिंकवर क्रिकेट प्रेमींना लाईव्ह मॅच बघता येणार….

हे देखील वाचा:

कोंबड्याची झुंज लावणाऱ्या तिघांना अटक

आगळी वेगळी प्रेमकहाणी – चंडीगढ करे आशिकी

Comments are closed.