जिल्हा भाजपा तर्फे “एक मंडळ एक दिवस”उपक्रम

जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांचं तालुक्यात जंगी स्वागत

0

सुशील ओझा, झरी: भाजपाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर नितीन भुतडा यांची निवड झाली. जिल्ह्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठींसाठी आणि संवाद साधण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेट देण्याचा निर्धार केला. “एक मंडळ एक दिवस” या उपक्रमांतर्गत मुकुटबन येथे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांचे आगमन झाले. प्रथम मुकुटबन येथील आश्रम शाळेला भेट दिली. गणेश उदकवार व चिंतेश्वर वैद्य यांनी भेट घेतली.

भाजपा कार्यालयाला व खरेदी विक्री संघाला भेट दिली. झरी पंचायत समितीला राजेश्वर गोंड्रावार यांच्या ऑफिसमध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत भाजपाचे तालुक्यातील पदाधिकारी, पुढारी, सरपंच कार्यकर्ते सर्वांची ओळख करून चर्चा केली. कार्यकर्यांना इतर कोणत्याही समस्या असल्यास थेट संपर्क करण्याचे सांगितले.

जिल्हाध्यक्ष भुतडा यांचे जंगी स्वागत भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश नाकले, सभापती राजेश्वर गोंड्रावार, अशोकरेड्डी बोदकुरवार, दत्तू चिंतावार, अंकुश लेंडे यांनी केले. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दुपारी बैठक घेतली. यावेळी पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार, सरचिटणीस प्रफुल चव्हाण, जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, राजू पडगिलवार, दत्ताजी राहाने, जिल्हा सचिव शंकर लालसरे,

झरी तालुका अध्यक्ष सतीश नाकले, महिला तालुका अध्यक्ष प्रिया भोयर, जेष्ठ नेते अशोकरेड्डी बोदकुरवार, माजी तालुकाध्यक्ष अनिल पोटे, सरचिटणीस अनिल विधाते, श्याम बोदकुरवार, संजय दातारकर, नीलेश भोयर, अनिल पावडे, सुरेश मानकर, मुन्ना बोलेनवार, सतीश दासरवार, राम आईटवार, दासू पडलवार, विठ्ठल पडलवार, मोहन चुक्कलवार, मनोहर खडसे, मनोज शर्मा, महेश बाडलवार,

विलास संसंनवार, गंगाधर राऊत, नगराध्यक्ष राजू मोहितकर, अंकूश लेंडे, अरुण पिंपळकर, बंडू वराडे, सुधीर पांडे, प्रवीण चुक्कलवार, प्रशांत गोंडे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष चक्रधर तीर्थगिरकर, दत्तू चिंतावार, प्रवीण विधाते, विनोद भोंग, विपीन ऐनवार, सुरेश भोयर, विनोद भोयर, दिगांबर मासटवार, गुणवंत पाईलवार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.