येनक मार्गावरील रस्ता खचला 

अपघाताची बळावली शक्यता

0
विलास ताजने, वणी : लगतच्या येनाडी ते येनक मार्गावरील रस्ता खचल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर रस्ता एक वर्षांपासून खचलेला आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. मात्र मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
येनक गावात ये- जा करण्यास हा एकमेव मार्ग आहे. या मार्गाने शालेय विद्यार्थ्यांच्या गाड्या, मालवाहू गाड्या धावतात. सदर रस्त्याची त्वरित डागडुजी करण्याची मागणी मनसेचे शिंदोला- लाठी सर्कलचे विभागीय उपाध्यक्ष रणजित बोंडे यांनी बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.