विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना प्रतिष्ठेचा MDRT बहुमान

सलग 5 वेळा मिळाला सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता योगेश पोद्दार यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. या आधी त्यांना चारदा हा बहुमान मिळाला आहे.

आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. या राउंड टेबल कॉन्फरंससाठी जगभरातील विमा एजेंट्स सहभागी होतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. या जागतिक संमेलनात सहभागी होण्याची संधी योगेश पोद्दार यांना मिळाली आहे.

MDRT हा बहुमान मिळण्यासाठी वर्षभरासाठी एक टारगेट दिले जाते. यावर्षी कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात संपूर्ण देशातील परिस्थिती गंभीर आहे. मात्र अशा गंभीर काळातही योगेश पोद्दार यांनी हे टारगेट पूर्ण केले हे विशेष आहे.

त्यांच्या या कार्याबद्दल अमरावती विभागाचे प्रमुख SDM मल्लिक व अमरावती विभागाचे विक्रीय विभागाचे प्रमुख MS धोंगडे यांनी वणी शाखेमध्ये येऊन सन्मानपत्र देऊन सन्मान केला. सोबत शाखाधिकारी प्रकाश झलके, विकास अधिकारी हेमंतकुमार टिपले आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.