तेली फैलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यात सातत्याने आत्महत्येच्या घटना

बहुगुणी डेस्क, वणी: तेली फैल येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अक्षय सत्यवान चौधरी (24) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा तेली फैलात राहत होता. दुपारच्या सुमारास घरी कुणी नसताना त्याने घरातील हॉलच्या छताला दुपट्ट्याने गळफास घेतला. 5 वाजताच्या सुमारास घराशेजारी राहणारी चुलत बहिण जेव्हा घरी गेली तेव्हा ही घटना उघडकीस आली. तिने याची माहिती तात्काळ तिच्या वडिलांना दिली. ते काही शेजा-यांना घेऊन घरी गेले असता तिथे अक्षय मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अक्षयच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.