9 व्या वर्गात शिकणा-या मुलीला फूस लावून पळवले

अज्ञात आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: 9 व्या वर्गात शिकणा-या एका कुमारिकेला अज्ञात इसमाने फूस लावून पळवले. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही 15 वर्षांची असून ती आपल्या आजी आजोबासह तालुक्यातील एका गावात राहते. ती वणीतील एका शाळेत शिक्षण घेत होती. सध्या परीक्षा संपल्याने ती घरीच राहायची.

शनिवारी दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घरातील सर्व सदस्य जेवण करून झोपी गेली. पीडिता ही आजीच्या बाजूलाच झोपली होती. रात्री 11 वाजताच्या सुमारास पीडितेच्या आजीला जाग आली. मात्र तेव्हा तिला तिची नात आढळून आली नाही. आजीने तिच्या पतीला झोपेतून उठवले. त्यांनी मुलीचा शोध घेतला. तसेच शेजा-यांकडे विचारणा केली मात्र ती आढळून आली नाही.

आजोबाने पीडितेच्या मोबाईलवर कॉल केला असता मोबाईल स्विच्ड ऑफ दाखवत होता. त्यांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे आजी आजोबाने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मोबाईल ठरतये घातक?
कोरोना काळात क्लास ऑनलाईन होत असल्याने पालकांनी आपल्या पाल्याला मोबाईल दिला होता. मात्र कोरोनानंतर त्याची गरज उरली नाही. शाळेतील मुलींना मोबाईलची गरज नसताना पालक त्यांच्याकडे मोबाईल देत असल्याने यातून मुली वाहवत असल्याचे समोर येत आहे. तालुक्यात सातत्याने अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवण्याचे प्रकार सुरु आहेत.

हे देखील वाचा: 

तेली फैलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Comments are closed.