पाटाळ्याच्या पुलाच्या कठड्याला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

व्हॉलिबॉल खेळाडुने संपवली आपली जीवनयात्रा

जितेंद्र कोठारी, वणी: पाटाळ्याच्या पुलावर असलेल्या एका लोखंडी कठड्याला गळफास घेऊन वणीतील एका तरुणाने आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तेजस विजय मोगरे (20) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव असून तो वणीतील आंबेडकर चौक येथील रहिवाशी आहे. शिवाय एक व्हॉलिबॉल खेळाडू म्हणूनही त्याची ओळख आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

तेजस हा आंबेडकर चौकातील वामनघाट रोडवर राहायचा. त्याचे वडील हे यवतमाळ येथे पोलीस विभागात कार्यरत आहे. आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी पाटाळ्याच्या पुलावरून जाणा-या काही लोकांना एक दुचाकी पुलावर आढळली, तसेच पुलाच्या कठड्याला एका तरुणाचा मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. दरम्यान या तरुणाचे नाव तेजस विजय मोगरे असल्याचे कळले. विशेष म्हणजे त्याचे पाय हे जमिनीला टेकलेल्या अवस्थेत आहे. तो तिथे पहाटेच्या सुमारास गेला असेल असा अंदाज बांधला जात आहे. त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. तेजस एक चांगला व्हॉलिबॉल खेळाडू होता. तसेच त्याचे वडीलही व्हॉलिबॉल खेळाडू आहे. तेजसच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

मयूर मार्केटिंगमध्ये ‘बाप्पा मोरया’ ऑफरला सुरूवात… खरेदीवर जम्बो डिस्काउंट

 

Comments are closed.