धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याचा उदेश्याने हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला स्था. गुन्हे शाखा पथकाने अटक केली. सदर कार्यवाही शनिवार 27 मे रोजी वणी येथील एसपीएम शाळा परिसरात करण्यात आली. राहुल संजय डबडे (21) रा. इंदिरा चौक वणी असे शस्त्रासह अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एसपीएम शाळेच्या मागे खुल्या मैदानात एक इसम लाल रंगाच्या कापडात गुंडाळलेली तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. माहितीवरुन स्था. गुन्हा शाखाचे पो.उप निरीक्षक योगेश रंधे पथकासह पोहचले असता शासकीय मैदानात पडक्या इमारतीजवळ बसलेल्या एका युवकला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून धारदार तलवार किंमत 1 हजार रु.जप्त केली. आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.