तरुणाची विष पिऊन आत्महत्या, लालगुडा येथे आढळला मृतदेह

सततच्या विश प्राशन करून होणा-या आत्महत्येने तालुका हादरला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा जवळील एका धाब्याच्या बाजूला एक युवक मृतावस्थेत आढळून आला. या युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. विठ्ठल आनंदराव ठावरी (30) असे मृतकाचे नाव असून तो कुरई येथील रहिवासी होता. तो अविवाहित होता व गावी आपल्या आई, वडील व भावासोबत राहायचा. आज सकाळी लालगुड्याजवळील तलावासमोर असलेल्या एका धाब्याच्या बाजूला सुमारास काही लोकांना एक मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान आनंद याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी विठ्ठल याचा मृतदेह शवविच्छेदानानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विठ्ठल याने आत्हमत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.

विष पिऊन एकाची आत्महत्या तर दुसरा गंभीर

 

Comments are closed.