पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतून चंद्रपूर येथे गणेश विसर्जनासाठी ढोल वाजविण्याकरिता गेलेल्या तरुणाचा मिरवणुकी दरम्यान अचानक मृत्यू झाला. मृतकाचे नाव सिद्धार्थ मरकवाडे, वय 32 वर्ष, रा. भीमनगर, वणी असून तो नगर पालिकेच्या घंटागाडीवर कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. तसेच तो ढोल पथकात वाजंत्री म्हणूनही काम करायचा. विसर्जनाच्या काळात तो वाजंत्रीचे काम करायचा. गुरुवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी तो मित्रांसोबत चंद्रपूर येथे गणपती विसर्जनात ढोल ताशा वाजविण्यासाठी गेला होता. मात्र मिरवणुकी दरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराने सिद्धार्थचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मूलं, सासू-सासरे असा मोठा परिवार आहे. सिद्धार्थवर शुक्रवार मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या अचानक जाण्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Next Post
Comments are closed.