कॉलेजचे विद्यार्थी अशी रील बनवतात की, सर्वत्र चर्चाच चर्चा…

'युवा भरारी' या तीन दिवसीय विशेष कला महोत्सवात विविध स्पर्धा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोशल मीडियावर सध्या रील्सची खूप चलती आहे. आपली अफाट कल्पकता वापरून अनेकजण भन्नाट रील्स म्हणजेच छोटा व्हीडीओ बनवात. अनेकदा ते आक्षेपार्ह तर कधी जीवघेणे देखील ठरतात. मात्र काही सृजन हे सर्वोपयोगी रिल्स तयार करतात. विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रेरणा देण्यासाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयाने ‘युवा भरारी’ हा तीन दिवसांचा उपक्रम घेतला. यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं, प्रतिभांचं देखणं प्रदर्शन केलं. या महोत्सवात रील मेकिंग स्पर्धा चर्चेत राहिली हे विशेष.  शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाने हा कला महोत्सव घेतला. याचं उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया यांनी केलं.

याप्रसंगी मंचावर संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक उमापती कुचनकार, अनिल जयस्वाल तथा प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते. दीप प्रज्वलन, नटराज पूजन आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमापूजनानंतर विद्यापीठगीत गायनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. यावेळी बरडिया यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचं ते म्हणाले. तारुण्य हे ‘भरारी’ घेण्यासाठीच असतं. त्यामुळे कला महोत्सवाचं ‘युवा भरारी’ हे नाव सार्थ ठरतं. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नवं काहीतरी करून दाखवण्याची त्यांची मानसिक तयारी होते. आपण शिकत असलेल्या संस्थेवर आपलं प्रेम असलं पाहिजे. या काळात आपण येणाऱ्या नव्या पिढीला आदर्शवत वाटावं असं कार्य करावं. आदी अनेक विषयांसह बरडिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध 13 कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविकामध्ये विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अभिजित अणे यांनी आपल्या आनंद व्यक्त केला. तसेच रील मेकिंग स्पर्धा ह्या आगळीवेगळ्या स्पर्धेच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी याप्रसंगी काही आवाहने केलीत. विद्यापीठाच्या सातत्यपूर्ण वेळापत्रकात थोडा सकारात्मक विरंगुळा मिळाणंही आवश्यक असल्याचं ते म्हणाले. त्यासाठीच या उपक्रमाचे वैशिष्ट्य त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थ्यांनी पुढील अध्ययनासाठी आवश्यक ऊर्जा संपादन करावी असेही ते म्हणालेत. 

संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के स्वत: नाट्यकलावंत आहेत. त्यांनी कलाक्षेत्रातील अनेक बारकाव्यांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. अधिकाधिक उपक्रमांत सहभाग घेत विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वाचा विकास करीत मनमुराद आनंद लुटावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी चेतना गेडाम हिच्या व्यक्तिगत तथा मागील वर्षी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात महाविद्यालयातर्फे सादर झालेल्या समूह नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.

 

Comments are closed.