सुशील ओझा, झरी: झरी येथे व्यापारी असोसिएशन व ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने पिण्याच्या पाण्याच्या पानपोईचे उदघाटन करण्यात आले. झरी तालुका असून येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, आरोग्य केंद, भूमिअभिलेख कार्यालय, शाळा, विद्यालय, बँक व इतर कार्यालय असून शासकीय व निमशासकीय कामाकरिता तालुक्यासह इतर गावातील हजारो लोक कामाकरिता येतात.
उन्हाचा पारा एवढा वाढला की कामानिमित्त आलेल्या गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्याकरिता इकडे तिकडे भटकावे लागत होते. ही बाब ग्रामवासी व व्यापारी यांच्या लक्षात येताच झरी येथे नगरपंचायत अध्यक्ष राजू मोहितकर यांच्या हस्ते रिबीन कापून थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळेस समस्त व्यापारी व ग्रामवासी उपस्थित होते.
उन्हाळा सुरू होऊन दोन महिने लोटूनही तालुक्यात कुठेही पाणपोई लावण्यात आली नव्हती. ज्यामुळे जनतेला पिण्याच्या पाण्याकरिता हॉटेल दुकान सारख्या ठिकाणी पाणी प्यावे लागत होते. दरवर्षी अनेक गावात पाणपोई लावून गरीब जनतेला पिण्याच्या पाण्याची गैरसोय टाळल्या जात होती परंतु या वर्षी तालुक्यात एकाही ठिकाणी पाणपोई लावण्यात आली नव्हती. ज्यामुळे जनतेला पाण्याकरिता भटकावे लागत होते. २० रुपयाची बिसलेरी पाण्याची बॉटल घेऊन तहान भागवावे लागत आहे. झरी येथे पाणपोई चे उदघाटन करून हजारो आम जनतेची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटविली ज्यामुळे व्यापारी असोसिएशन व गावकऱ्यांचे आभार मानले जात आहे.