बहुगुणी डेस्क, वणी: पूज्य सिंधी पंचायत व सिंध युवा मंच वणीद्वारा झुलेलाल जयंती साजरी होत आहे. या निमित्त शनिवार दिनांक 29 मार्च आणि रविवार दिनांक 30 मार्चला सिंधी पंचायत दरबार येथे विविध कार्यक्रम होतील. या अंतर्गत शनिवारी सायं 5.30 वाजता साई आरती, पल्लव साहिब व नितनेम होईल.
त्यानंतर लगेच सायंकाळी 7.00 वाजता रायपूर छत्तीसगड येथील सक्षम कटारिया व कटारिया ब्रदर्स ‘एक शाम झूलेलाल साई के नाम’ हा कार्यक्रम प्रस्तुत करतील.रविवारी अम्रितवेले ४:४५ धन धन श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज जी यांचे गुरु प्रकाश व नितनेम होईल.सकाळी 6.00 वाजता शहराच्या प्रमुख मार्गावरून स्कूटर रॅली निघेल. जिचा निर्गुडा नदीवर समारोप व पल्लव साहिब (अखों) होईल.
त्यानंतर सकाळी 7.00 वाजता गोदडीवाले धाम येथे लाल साईजी यांचा मूर्ती अभिषेक होईल. त्यानंतर सकाळी 7.30 वाजता दरबार साहिब येथे लाल साई जी यांचा मूर्ती अभिषेक होईल. तत्पश्चात आरती साहिब व पल्लव साहिब आणि अल्पोपाहार होईल. बसस्टॅण्ड जवळील शिशमहल समोर सकाळी 10.00 वाजता चन्ना सरबत वितरण करण्यात येईल.
रविवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत कटनीवाले भगत सुशीलकुमार यांचे कीर्तन होईल. नंतर लंगर साहिब म्हणजे महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. सायंकाळी 5.00 वाजता शोभायात्रा व बैराणा साहिब निर्गुडा नदीपर्यंत निघेल. रात्री 8.00 वाजता कॉलोनी ग्राउंड येथे आनंद मेळावा होईल. या दोन दिवसीय उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याची विनंती पूज्य सिंधी पंचायत व सिंध युवा मंच वणी यांनी केली आहे.
Comments are closed.