सुंदर दिसायचं असल्यास घ्या पुरेशी झोप

झोपेचा आणि सुंदर दिसण्याचा आहे जवळचा संबंध

0 174

झोपेचा आणि आणि तुमच्या सुंदर दिसण्याचा संबंध असेल असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक करायचं असेल तर तुम्हाला पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

रॉयल सोसायटी ओपन सायन्स जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चनुसार, जर एखाद्या व्यक्तीची दोन रात्र पूर्ण झोप झाली नसेल, तर त्याच्या व्यक्तीमत्त्वावर त्याचा परिणाम होतो. स्टॉकहोम विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. या संशोधनसाठी डॉक्टरांनी 25 जणांचे अध्ययन केले. यातील एका समुहाला दोन रात्र मनसोक्त झोपण्यास सांगितले होते. तर दुसर्‍या समुहाला दोन रात्रींसाठी केवळ चार-चार तास झोप घेण्यास सांगितले होते.

रिसर्चच्यावेळी दोन्ही समुहातील व्यक्तींचे मेकअपशिवाय फोटो काढण्यात आले. त्यांचे हे फोटो 122 अज्ञात लोकांना दाखवून यामधील अँक्टिव्ह, हेल्दी, उत्साही, आणि विश्‍वसनीय कोण वाटतो, असे विचारले. यावेळी अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली. पण यातील बहुतांश जणांनी ज्या लोकांची चार-चार तासच झोप झाली होती, त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. तर ज्यांची झोप पूर्ण झाली होती, ते सर्वाधिक उत्साही आणि त्यांच्या चेहर्‍यावरही प्रसन्नता होती.

(हे पण वाचा: शरीराला व्यायाम का आहे गरजेचा ?)

यावरून ज्यांची झोप वेळेवर होते, त्यांचे आरोग्यही चांगले असते, तसेच ते सदैव उत्साही असतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. तसेच यामुळे लोक तुमच्या व्यक्तीमत्त्वाप्रती सकारात्मक असतात असंही संशोधकांनी सांगितले. त्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वात सकारात्मक बदल घडवण्यासाठी रोज आठ तास झोप पूर्ण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.अनेक महिलांकडून ब्यूटी स्लीप विषयी तुम्ही ऐकले असेल. अनेकांना त्यात तथ्य नसून, ते एक मिथक वाटते. पण ब्यूटी स्लीप मिथक नसून, सत्य आहे. एका नव्या संशोधनानुसार, वेळेवर झोपण्याने तुमच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो, असा दावा करण्यात आला आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...