Video: ढिंचाक पूजाचं नवीन गाणं लॉन्च

बघा काय आहेत नवीन गाण्याचे शब्द ?

0

नवी दिल्ली: बेसु-या आणि बेताल गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या ढिंच्याक पूजा आता एक नवीन गाणं घेऊन आली आहे. गेल्या आठवड्यात आपण लवकरच नवा व्हिडिओ घेऊन येणार अशी फेसबुक पोस्ट पूजाने अपलोड केली होती. त्यानंतर आता ढिंच्याक पूजाने नवं गाणं लाँन्च केलं आहे. यासंबंधी पूजानं आपल्या यूट्युब चॅनेलवर लिरिक्स व्हिडिओ अपलोड केला आहे.

नवीन गाण्याचे शब्द हे ‘बापू देदे थोडा कॅश’ असे आहेत. या गाण्याचा व्हिज्युअल व्हिडिओ नसला तरी हा एक लिरिक्स व्हिडिओ आहे. काही दिवसांपूर्वी ढिंच्याक पूजाचं ‘दिलों के शूटर है मेरा स्कूटर’ हे गाणं लाँन्च झालं होतं. या गाण्यात पूजाने हेल्मेट न घालता गाडी चालवत वाहतुकीचे नियम मोडले म्हणून दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई देखील केली होती.

((ढिंच्याक पूजाचे गाणे यूट्यूबनं हटवले))

सेल्फी मैने लेली आज या गाण्यानंतर तिनं दारू-दारू, स्वॅगवाली टोपी आणि दिलों के शूटर है मेरा स्कूटर ही गाणीही यूट्यूबवर अपलोड केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ढिंच्याक पूजाच्या यूट्युब चॅनलवरून तिचे सर्व व्हिडिओ काढून टाकण्यात आले होते.

नवीन गाण्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा:

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!