चर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा 15 जुलै रोजी

संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंच वणीचे आयोजन

0 379

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः येथील संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंचाचे गुणवंतांचा गौरव सोहळा रविवारी 15 जुलै रोजी होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम येथे सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव होईल. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे या सोहळ्याचे उद्घाटन करतील.

स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष रविकिरण घोलप, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे मुख्य संघटक ज्ञानेश्वर वरपे, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गोपाल चंदन, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गोपाल चंदन, माजी कुलगुरू वेंकटेश्वरा विद्यापीठ, उत्तर प्रदेश, जे.जे.टी. विद्यापीठ, राजस्थानचे माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा.अर्जुन महादेव मुरुडकर, बुलडाण्याचे उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, मुंबई उच्च न्यायालयाचे महाधिवक्ता नारायणराव गायकवाड, पाणी पुरवठा विभाग,नगर परिषद, वणीचे माजी सभापती संबा वाघमारे यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे.

संत रविदास युवा मंचाचे किशन संभाजी कोरडे यांनी ‘‘वणी बहुगुणी’’शी बोलताना या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले की समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन मिळावे, प्रेरणा मिळावी, समाजबांधव एकत्र यावेत, सुसंवाद साधला जावा या व अशा अनेक कारणांसाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चर्मकार समाजातील पदवी, पदविका, कला, वाणिज्य, इंजिनिअरिंग, मेडिकल, आय टी आय, फार्मसी, दहावी, बारावी तसेच इतर क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव आयोजित केला आहेण् समाजबांधवांसाठी ही एक अपूर्व संधी आहे. त्यामुळे एवढ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच गुणवंताना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंचाने केली आहे. अधिक माहितीकरिता महेश लिपटे ८६५७४१२३८९, किशन कोरडे ९९२११६९८१६, रवी धुळे ९०२८४९७८७९, आकाश डुबे ९९२१०३१४२७, संदीप वाघमारे ९६०४१५५५२८, योगेश सोनोने ८२३७२६३७५, भारत लिपटे ९८२२६४२९७२, अमोल बांगडे ९५५२३३२२३९, किशोर हांडे ९८६०४००८१९, हेमंत वाघमारे ९८२३८८८३६५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

mirchi
Comments
Loading...