विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, 600 स्पर्धकांचा सहभाग

किशोर, राजश्री, दशरथ यांनी मारली बाजी

0 471
प्रतिनिधी, शिंदोला: शिंदोला येथे रविवारी 13 ऑगस्टला विदर्भ स्तरिय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुरुष गटात नेरचा (अमरावती) किशोर जाधव, महिला गटात नागपूरची राजश्री पदमगिरवार,अठरा वर्षे खालील मुलांच्या गटात वासीमचा दशरथ वानी तर चवदा वर्षे खालील गटात कुरईचा तुषार परसुटकर यांनी बाजी मारली.

 

शिव बहुउद्देशीय संस्था व संजय निखाडे मित्र परिवार यांच्या वतीने संजय निखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. चार गटात विभागलेल्या स्पर्धेत सहाशे धाव पटूंनी सहभाग घेतला. परिसरात पहिल्यांदाच विदर्भ स्तरीय स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

पुरुष गटात नेरचा (अमरावतीचा) किशोर जाधव हा शेतकरी पूत्र पहिला, नागपूरचा स्वप्निल गावंडे दुसरा, नागपूरचाच देवेंद्र राणे तिसरा तर अमरावतीचा शुभम सोहणे चवथा मानकरी ठरला. तर महिला गटात नागपूरची राजश्री पडमगिरवार पहिली, राजूर(वणीची)रितू पेंदोर दुसरी, चंद्रपूरची जैनत खान तिसरी तर बोर्डाची(वणी) सपना राऊत चवथी विजेती आली.

अठरा वर्षे गटात वासीमचा दशरथ वानी पहिला, चंद्रपूरचा जीवन यादव दुसरा, यवतमाळचा अभिषेक जासुस तिसरा तर वणीचा विरेंद्र चेंदेल चवथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तर चवदा वर्षे गटात तुषार परसुटकर, राहूल काकडे, सुमित मत्ते, रोहीत ताजने सर्व राहणार कुरई (शिंदोला) हे अनुक्रमे बक्षीसाचे मानकरी ठरले.

पहिले आलेले स्पर्धक

स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार विश्वास नांदेकर, पं. स. सदस्य संजय निखाडे, सरपंच बबन मंगम, उपसरपंच संदीप थेरे, प्रहार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, अनिल राजूरकर, सुभाष भोंगळे,जीवन डवरे, तुलसीराम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांचा रोख व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

स्पर्धेनंतर झाले आरोग्य तपासणी शिबिर
स्पर्धा संपल्यानंतर आरोग्य शिबिर पार पडले. यात 270 रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधं देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. बोबडे यांनी केले. तर आभार संजय निखाडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रवीण पाल, किशोर किनाके, विजय घाटे, निखिल देरकर, चंदू गिरी, वैभव निखाडे, गणेश मंगम, नंदू गिरी यांनी परिश्रम घेतले.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...