निंबाळा येथे भीषण अपघात, एकाचा मृत्यू

दुचाकीला दिली ट्रकने धडक

0

निंबाळा येथे भीषण अपघात : दुचाकीस्वाराचा मृत्य

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दुपारी दुचाकी व ट्रकच्या अपघातात तरुण जागीच ठार झाक्याची घटना निंबाळा फाट्याजवळ घडली. याबाबत ट्रक चालकाला अटक करण्यात आली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दीपक सियाराम केवट (21) हा दुपारी राजूर येथून कामानिमित्त मारेगाव जाण्यासाठी निघाला. मारेगाववरून येत असताना  दिपकच्या बजाज डिस्कवर गाडी क्रमांक (MH 29 AH 8802) ला समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक (MH 43 ए 5951) या वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत दीपक दूरवर फेकल्या गेला. यानंतर दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास दीपक याच्या शेजाऱ्याच्या दिपकच्या वडिलांना माहिती दिली की, त्यांचा मुलगा दीपक याचा निंबाळा फाट्याजवळ भीषण अपघात झाला.

वडिलांना माहिती मिळाली की दिपकला वणीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दिपकच्या वडील रुग्णालयात गेले असता दिपकचा मृत्यू झाला होता व त्याचे शरीरही जळाले होते. याबाबत दिपकच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ट्रकच्या वाहन चालकाला अटक केली व त्याच्यावर कलम 279, 304 (अ) व सहकलम 52/119,  130(3), /177, 3/181 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.