काँग्रेसच्या कमजोर उमेदवारामुळे राष्ट्रवादी नाराज

राकाँचे नेते कार्यकर्ते तथस्थ राहण्याची शक्यता

0
बहुगुणी डेस्क: चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार निवडीचा फार्स चांगलाच रंगात आला आहे. क्षणाक्षणाला नवनवीन अपडेट येत असल्याने या फार्समध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तोडीचा उमेदवार न दिल्याने काँग्रेससोबतच आता राष्ट्रवादीमध्येही नाराजी असल्याच समोर येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ राहण्याची चिन्हे आहेत. जर असे झाले तर हा काँग्रेसला मोठा धक्का असेल. याबाबत शनिवारी रात्री  राष्ट्रवादीची गुप्त बैठक झाल्याची ही माहिती आहे. तसेच बैठकीनंतर वणी विधानसभेतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार व इतर ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलून नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे. 

आमदार बाळू धानोरकर यांना तिकीट नाकारून विनायक बांगडे या नवख्या आणि परिसरात प्राबल्य नसलेल्या उमेदवाकासा तिकीट दिल्याने सध्या काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे. कमजोर उमेदवार दिल्याने वणी मारेगाव परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. आता यात राष्ट्रवादीनेही उडी मारली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसने आता कमजोर उमेदवार दिल्याने तठस्थ राहण्याशी शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या गेल्या काही दिवसांपासुन काँग्रेसचा उमेदवार निवडीचा फार्स सुरू आहे आधी विशाल मुत्तेमवार या आयात उमेदवारा चे नाव चर्चेत आले होते मात्र स्थानिकांनी परका उमेदवार नको म्हणून नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर बाळू धानोरकर यांचे नाव चर्चेत आले होते त्यांनी आमदारपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष कडे सुपूर्द केल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली गेली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहे. हंसराज अहिर यांच्यासारखे केंद्रीय मंत्री पदी असलेले तुल्यबळ उमेदवाराविरोधात त्यांच्या तोडीचा उमेदवार न दिल्याने कार्यकर्ते जाहीर नाराजी व्यक्त करीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बागडे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का बसला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसची शनिवारी रात्री एका ज्येष्ठ नेत्याच्या घरी तातडीची गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. यात वणी मारेगाव झरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत जर काँग्रेसने दुसरा तुल्यबळ उमेदवार दिला नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी तटस्थ राहावे असा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती ‘वणी बहुगुणी’जवळ आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर महेंद्र लोढा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी गुप्त बैठक याबाबत दुजोरा दिला नाही. तसेच आम्ही तठस्थ राहू शकत नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र त्यांनीही उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की….

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यामुळे उमेदवार कोणताही असला, तरी आम्ही आघाडी धर्म पाळणार आहोत. मात्र काँग्रेसने हंसराज अहीर यांच्या विरोधात ताकदीचा उमेदवार दिला असता तर योग्य झाले असते. काँग्रेसने जाणून बुजून हरण्यासाठी कमजोर उमेदवार दिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असून कार्यकर्ते नाराज असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसने वणी मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे गाव तिथे शाखा या उपक्रमाद्वारे त्यांनी गावोगावी शाखा उघडली आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ राहिली तर त्याचा चांगलाच फटका काँग्रेसला बसू शकतो. आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने या प्रकरणात आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.