शिंदोल्या लगत दोन दुचाकीची समोरासमोर धडक

निवृत्त वेकोलि कर्मचारी ठार, दोन जखमी

0 763

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला ते शेवाळा फाट्या दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक ठार तर दोन जन जखमी झाल्याची घटना दि.१९ बुधवारला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

येनाडी येथील बापूराव गोखरे वय ६० असे मृतकाचे नाव आहे. कोलगाव येथील अभिषेक तिराणकार वय २३ आणि शिंदोला येथील नोमेश्वर पिदूरकर वय ४० असे जखमीचे नाव आहे. मृतक बापूराव गोखरे हे वेकोलीचे निवृत्त कर्मचारी होते. गोखरे यांचे शिंदोला येथे हार्डवेअरचे दुकान आहे. ते सध्या घुगूस येथे राहत होते.

शिंदोला येथे गोखरे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शिंदोला येथील कामे आटोपून बांधकाम मजूर अभिषेक तिराणकारला घेऊन दुचाकी क्र.MH 29 AX 3650 ने घुगूसला जाण्यासाठी निघाले. तर त्याचवेळी शिंदोला माईन्स वरून नोमेश्वर पिदूरकर हा दुचाकी क्र.MH 29 BG 1481 ने शिंदोला गावाकडे येत होता.

नोमेश्वरची भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन गोखरे यांच्या दुचाकीवर येऊन धडकली. धडक एवढी भीषण होती की घटनास्थळीच अतिरक्तस्त्राव होऊन गोखरे यांचा मृत्यू झाला. तर अभिषेक हा किरकोळ जखमी झाला असून त्याला घुगूस येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. नोमेश्वर हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील दवाखान्यात भरती करण्यात आले.

आरोपी गाडी चालक नोमेश्वर पिदूरकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. मृतकाच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे

mirchi
Comments
Loading...