महालोकअदालत व मोफत कायेदेविषयक मार्गदर्शन

0

जयप्रकाश वनकर,बोटोनी: येथील चोपणे माध्यमिक विद्यालय येथे ग्राम पंचायतीने महालोकअदालतीचे  आयोजन केले. लोकांसाठी खासकरून महिलांसाठी असलेल्या कायद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेई यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली. स्त्रियांचे  अधिकार स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या तेजस नगराळे, मानसी मिन्देवार, आदी विद्यार्थांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोटोनी येथील सरपंचा मंजूषा मडावी होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक निवृत्त न्यायाधीश बोधनकर होते. कार्यक्रमात अड. हुसेनी अड. परवेज पठाण, अड. पावडे, मारेगावचे ठाणेदार  दिलीप वडगावकर यांनी येथील जनतेला मार्गदर्शन केले. विविध गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी जनतेने घ्यावयाची काळजी, शिक्षणाचे महत्व, स्त्री भ्रूणहत्या, कुमारी माता, बाल लैंगिक अत्याचार, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी  इत्यादि विषयावर मार्गदर्शन मान्यवरांकडून लाभले.

कार्यक्रमासाठी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महा लोकादालती मध्ये मोटार वाहन संबधित एकूण सात प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.

कार्यक्रमा मध्ये मंजूषा मडावी पं.स सदस्या सुनिता लालसरे चोपणे शाळेचे मुख्याध्यापक सुनील चोपणे, महिला बाल संरक्षक अधिकारी राऊत यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.  बोटोनी ग्राम पंच्यात सचिव आशा वटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सूत्र संचालन प्रवीण खंडाळकर यांनी केले तर आभार नरेंद्र नक्षणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यात ग्राम पंचायत कर्मचारी जानुभाऊ दोडेवार, शरद डाहुले, अनिल कुमरे त्याच बरोबर चोपणे विद्यालयातील कर्मच्यार्यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.