चनाखा येथे सौरऊर्जा पंपाचे लोकार्पण

0 572

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील चनाखा येथे सौरऊर्जा पंपाचे लोकार्पण आणि समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन (दि.६) मंगळवारी सकाळी करण्यात आले. शिंदोला येथील असोसिएशन सिमेंट कंपनीच्या वतीने सदर योजनेची निर्मिती करण्यात आली.

याप्रसंगी सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक रेड्डी, सी.एस.आर. चे प्रमुख विजय खट्टी, सरपंच भानुदास काकडे, उपसरपंच गजानन झाडे, सदस्य आशा ओमप्रकाश थेरे, संगीता संतोष निमकर, ग्रामसेवक पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर सिमेंट कंपनीच्या वतीने परिसरातील बाधित गावात विविध प्रकारच्या समाजउपयोगी योजनांची निर्मिती केली जाते. पांदण रस्ते, पाणी पुरवठा योजना, जलसिंचन साहित्य पुरवठा, बंधारे, क्रीडा साहित्य वाटप, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी आदी उपक्रम राबविले जातात.

mirchi
Comments
Loading...