मारेगाव मध्ये अवैध रॉकेलचा साठा जप्त

साठेबाजाकडून 820 लीटर रॉकेलचा साठा जप्त

0 228

मारेगाव: मारेगाव जवळील मंगरुळ गावाजवळ अवैध रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. यात प्रवीण विठ्ठल आस्वले राहणार मंगरुळ याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून चार टाक्या रॉकेल जप्त करण्यात आले आहे. वणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

28 जुलैच्या रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना खबर माहिती मिळाली की मारेगाव जवळील मंगरुळ गावात एका इसमानं अवैधरित्या रॉकेलची साठेबाजी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली. त्यात त्यांना एक डबकीत रॉकेल आढळून आलं. याबाबत अधिक माहिती विचारली असता त्यानं बाजुच्या नालीत चार टाक्या रॉकेल ठेवल्याचं सांगितलं.

( ही बातमी पण वाचा: मारेगावातील वैद्यकीय सेवा मोजत आहे अखेरच्या घटका)

या प्रकरणी पोलिसांनी 200 लीटरच्या चार टाक्या आणि 20 लीटरची एक डबकी असं एकून 820 लीटर रॉकेल जप्त केलं आहे. हा मुद्देमाल सुमारे 32800 रुपयांचा आहे. आरोपीविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3, 7 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाई राहुल मदने उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, महेंद्र भुते, इक्बाल शेख, आशिष टेकाडे, रवि इसनकर यांनी केली

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...