कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना

97 हजार 464 औद्योगिक ग्राहकांना होणार योजनेचा लाभ

0

निकेश जिलठे,वणी : वीज बिल न भरल्यामुळे  कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात  आलेल्या महावितरणच्याऔद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या  मुळ थकबाकी वरील व्याज व  विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. अमरावती परिमंडळातील 4361 तर राज्यातील सुमारे 97 हजार 464 औद्योगिक ग्राहकांना  या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे अमरावती परिमंडळातील ग्राहकांना 2 कोटी 34 लक्ष व संपूर्ण राज्यासाठी सुमारे 231 कोटीचा व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.

राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचावीजपूरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहेअशा ग्राहकांसाठी महावितरणने दि. 1 जून 2018 ते दि 31 ऑगस्ट 2018 या तीन  महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे.  ज्या वीजग्राहकांचा वीज पुरवठा दि. 31 डिसेंबर 2017  पूर्वी कायमस्वरुपी खंडीत करण्यातआला आहे. अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मुळ थकबाकीची  रक्कम भरल्यास त्यांना 100 टक्के व्याज व विलंब  आकाराची सवलत मिळणार आहे. दि. 1 जूलै 2018 ते दि. 31 ऑगस्ट 2018 या दरम्यानग्राहकाने मुळ थकबाकीची रक्कम व व्याजाची 25 टक्केरक्कम भरली तर उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला  मिळणार आहे.

जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षापेक्षाअधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिलीअसेल तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाचवेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकाला 100 टक्के व्याजाचीमाफी मिळणार आहे. तसेच जे न्यायालयीन प्रकरण 12वर्षे पर्यंतचे आहे व न्यायालयाने डिक्रीची  रक्कम  दिली आहे. अशा ग्राहकांनी एका टप्प्यात डिक्रीची  रक्कमभरल्यास त्यांना 50 टक्के व्याजमाफीची सूट मिळणार आहे. यासर्व प्रकरणात  न्यायालयीन प्रक्रियेचा  खर्चसंबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे.

ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख /नेटपेमेंट/चेक यामाध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कमभरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधितग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. या अभय योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहितीघ्यावयाची आहे अशा ग्राहकांनी  महावितरणचे अधिकृतसंकेतस्थळ www.mahadiscom.in यावरील’AMENESTY SCHEME 2018 या लिंकवर जावूनग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकल्यास या योजनेची व ग्राहकाच्या थकबाकीची संपुर्ण माहिती उपलब्ध होईल.या योजनेत दि. 1 जून 2018 पासून  ग्राहकांना सहभागीहोता येईल. याबाबतचे परिपत्रक महावितरणच्यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठाखंडीत जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी यायोजनेचा  लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.