कलापथकातील कलाकाराचा आकस्मित मृत्यू

पथनाट्य करून आल्यावर वणीत मृत्यू

0

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत पथनाट्य सादर करणा-या एका कलावंताचा वणीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी दुपारी घडली. सकाळी घाटंजी येथील सहा जणांचे कलापथक पथनाट्यासाठी वणी तालुक्यातील चिखली येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून संच वणीत आला होता. यातील नारायण मारोती बनसोड (40) राहणार तुंभारी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ यांच्या डाव्या पायात दुखू लागले. त्यामुळे त्याला कलापथकातील सहका-यांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी नारायणवर उपचार केला व बेडवरच काही वेळा आराम करण्यास सांगितले. दुपारची वेळ असल्याने त्यांच्या सहका-यांनी जेवण केले नव्हते. त्यामुळे नारायण यांनी त्यांच्या सहका-यांना जेवण करून येण्यास सांगितले. इतर सहकारी जेवण करण्यास गेले. परत आल्यावर त्यांना नारायण हा ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरील भिंतीजवळ बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्यांनी त्याला त्वरीत पुन्हा रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी सध्या आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर कारण समजू शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.