पीएम सन्मान निधी: केवायसी पूर्ण करा; अन्यथा लाभ विसरा…

अवघे दोन दिवस उरलेत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी... 'या' ठिकाणी किंवा या पद्धतीने करता येईल ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही अद्याप त्याचे KYC केले नसेल, तर ते बुधवारी दिनांक 31 ऑगस्टच्या आत करा. म्हणजे आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे केवायसी अपडेट न केल्याने 11 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबर महिन्यात योजनेचा 12 वा हप्ता जाहीर करू शकते. त्यामुळे जर केवायसी केली नसल्यास ताबडतोब केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन तहसीलदार वणी यांच्या तर्फे करण्यात आली आहे. ई-केवायसी करण्याच्या काही पद्धती आहेत. त्या आम्ही आपल्याला सांगत आहोत. 

बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी कोणाला संपर्क कराल?
PM किसान (PMKISAN) मध्ये नोंदणीकृत शेतकरी बांधवांसाठी E-KYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. सरकारने नोटीसमध्ये म्हटले आहे की बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी, जवळच्या सीएससी (CSC centres, Common Service Centres) संपर्क साधावा लागेल. किंवा ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून ही करता ई केवायसी करता येईल.

ऑनलाईन प्रक्रिया अशी पूर्ण करायची?
PM किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्चवर क्लिक करा.
आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
‘ओटीपी प्राप्त करा’ आणि एंटर करा…

पूर्ण न झाल्यास येथे संपर्क साधा
सर्व तपशील योग्यरित्या एंटर केल्यास आणि शिफारसीशी जुळल्यास, eKYC पूर्ण केले जाईल. ते पूर्ण न झाल्यास, ते अवैध म्हणून चिन्हांकित केले जाईल. असे झाल्यास संबंधित लाभार्थीने स्थानिक आधार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. पीएम-किसान योजनेंतर्गत, सरकार प्रत्येक भूमिधर शेतकरी कुटुंबाला सरकारकडून दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये प्रति वर्ष एकूण 6000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते. 31 मे रोजी, पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 11 वा हप्ता जारी केला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.