सांस्कृतिक कार्यक्रमात आदर्श विद्यालय अव्वल…

0

वणी (विलास ताजने): वणी येथील शासकीय मैदानावर प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालय आणि जेसीआय क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात माध्यमिक गटात वणीच्या आदर्श विद्यालयाचा नृत्य गट प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला.

 

सदर सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक शाळांनी सहभाग घेतला. तीन गटात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आदर्श विध्यालयाच्या कलाकारांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करणारा देखावा “जगदंब जगदंब जगदंब, छत्रपती खडग धर. वज्रतेज रुद्रस्वर” या गाण्याच्या माध्यमातून सादर केला. सदर दृश्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेत माध्यमिक गटात प्रथम पुरस्कार प्राप्त केला. योगायोगाने दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात सदर देखाव्याचे सादरीकरण केले गेले.

 

तहसीलदार आर. आर. जोगी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक सोनटक्के, गणपत अतकरे यांनी काम पाहिले. संचालन गजानन कासावर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी शिक्षक रवींद्र उलमाले, रमेश ढूमने, बाबाराव कुचनकर, लता पाटणकर, संध्या लोणारे, पूनम सिंग, विनयसिंग सेंगर यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव जयसिंगराव गोहोकार, सहसचिव महादेवराव वल्लपकर, मुख्याध्यापक सुरेश घोडमारे यांनी प्रभारी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.