वाघाने पुन्हा केला वासरावर हल्ला

0 478

रवि ढुमणे, वणी: तालुक्यातील कवडशी येथील मारोती भदु कामतवार या शेतकऱ्याच्या  शेतात बांधलेल्या वासरावर रात्रीचे सुमारास वाघानं हल्ला चढविला. यात वासरू गंभीर जखमी झाले आहे. या हल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात वाघाच्या दहशतीचे चांगलेच वातावरण निर्माण झाले आहे.  एकापाठोपाठ एक असे वाघाचे हल्ले होत आहे. दररोज काही न काही घटना घडत आहेत. परिणामी शेतकरी व सामान्य जनता दाहशतीत वावरत आहेत. तालुक्यातील कवडशी येथील  मारोती कामतवार हे शेतकरी शेतात रात्री पहारा करण्यासाठी शेतात गेले होते. रात्री अचानक वाघाने शेतात बांधून असलेल्या वासरावर हल्ला चढविला. वासराचा आवाज येताच शेतकरी जागा झाला.त्याने आरडाओरडा सुरू केला. परिसरातील शेतकरी मदतीला धावले.  प्रसंगी वाघाने तेथून पळ काढला. करीत माञ वासरू  गंभीर जखमी झालेले होते. वनविभागाने भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे
वाघाच्या हल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने मनुष्यहानी होण्याची वाट न पाहता त्वरीत पावले उचलण्याची मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे
Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...