झरी तालुक्यात उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री

अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे परवानाही नाही

0

सुशील ओझा, झरी: परिरसात उघड्यावर विक्री होणारे खाद्य पदार्थ सेवन केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. शहरातील अनेक हॉटेलकडे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी नसून या हॉटेलमधून उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने खुलेआम भेसळ खाद्यपदार्थीची विक्री होत आहे.

तालुक्यातील मुकुटबन, पाटण, झरी, घोंसा, माथार्जुन आणि शिबला या गावात मुख्य आठवडी बाजाराचे ठिकाणी व शहरात उघड्यावर खाद्यपदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहेत. अशा विक्रीच्या ठिकाणी अशुद्धपाणी, आजूबाजूला पसरलेली घाण आणि कचरा असतानाही हे विक्रेते याकडे दुर्लक्ष करीत आपल्या खाद्यपदाथार्चा धंदा फोफावत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.

पावसाळा सुरू होताच शहरासह ग्रामीण भागातही लहान – मोठे होटेल व आठवडी बाजारात उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री करणारे विक्रेत्यांची झुंबळ वाढली आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेलपुरी, समोसा, कचोरी, आम्लेट आणि साऊथ इंडियन व चायनीज खाद्यपदार्थाचा समावेश आहे. खाद्यपदार्थ सर्रास उघड्यावर विक्री केली जात आहेत. या खाद्यपदार्थ बनविणाऱ्या साहित्यात रासायनिक व विविध आरोग्यावर परिणाम करणारे घातक वस्तूचा वापरही केला जात आहेत.

खाद्यपदार्थाची विक्री होणाऱ्या ठिकाणी कमालीची दुर्गनधी व अस्वच्छता पसरलेली असते मात्र या विक्रीवर अन्न वऔषधी प्रशासनाकडून कुठलीही तपासणी मोहीम व कारवाई होत नसल्याने हे उघड्यावर विक्री केलेले पदार्थ खाल्याने विविध आजारांना बळी पडावे लागत आहेत. विशेष म्हणजे अनेक हॉटेल व्यावसाईक तसेच टपरी दुकानदाराकडे परवाने नसल्याची माहिती आहे.

हॉटेल व्यावसायीकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणताही अधिकार नसताना खुलेआम उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री सुरु असून, सबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. आठवडी बाजारात खुलेआम उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून कारवाई करावी अशी मागणी होत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.