ताबिश प्रकरण: भिसी व्यवसायातील गुंतवणुकीतून घडले नाट्य ?

ताबिशच्या डोक्यावर कोट्यवधींचं कर्ज, तर लाखोंची वसुली होती बाकी

0

वणी: ताबिश अपघात प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. ही घटना घडून दहा दिवस उलटत आहे मात्र अद्याप ताबिशचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचं गुढ वाढतच चाललं आहे. सोबतच शहरात विविध चर्चेला उधाणतही आलं आहे. कुणी ताबिश वाहून गेला बोलत आहे, तर कुणी ताबिशचा गेम करण्यात आला असं बोलतये, पण आता या चर्चा मागे पडल्या असून ताबिशनं भिसीच्या व्यवसायातील कोट्यवधीच्या गुंतवणुकीतून हे नाट्य रचल्याची खमंग चर्चा सध्या शहरात रंगत आहे.

शहरातील शास्त्री नगर भागात ताबिश राहायचा. ताबिश भिसीचा व्यवसाय करायचा. या व्यवसायात चोख व्यवहारामुळे त्यानं अनेकांची मनं जिंकली होती. त्यामुळे काही दिवसांतच त्याच्या भिसीच्या व्यवसायात गुंतवणूक करणा-यांची संख्या झपाट्यानं वाढली. ज्या काही भिसीच्या मेंबर्सनं भिसीची उचलप घेतली होती त्याची परतफेड काही मेंबर्सनं केली नव्हती. त्यामुळे त्याला लाखोंचा चुना लागला होता. ताबिशला अनेक मेंबर्सकडून लाखो रुपये घेणे होते. मात्र त्यापेक्षा अधिक रुपये त्याला भिसीच्या मेंबर्सला देणे होते. असा अंदाज बांधला जातोय की कोट्यवधींची रक्कम ताबिशला परत करायची होती.

एकीकडे ग्राहकांकडे असलेले लाखो रूपये तर दुसरीकडे ग्राहकांचे ताबिशकडे असलेलं कोट्यवधींचं कर्ज, सोबतच बॅकेचं त्याचं चालू कर्ज खातं होतं. त्यातील व्याजाचा भरणा देखील त्याला करायचा होता असं समोर येतंय. त्याच्यावर असलेलं कर्ज आणि भिसी मेंबर्सची देणी यातून ताबिशनं अपघाताचं नाट्य रचल्याची चर्चा सध्या वणीत जोर धरायला लागली आहे.

या प्रकरणाचा योग्य तो तपास करण्यात सध्या पोलीस गुंतले आहे. मात्र ताबिशबाबत सध्या कोणताही क्लू पोलिसांना मिळत नाहीये. त्यामुळे ताबिशने स्वतःचं हे अपघाताचं नाट्य रचलं असा कयास वर्तवण्यात येत आहे. कुणी बोलतात की ताबिश उत्तर भारतात गेला आहे. तर कुणी दक्षिणेत गेल्याचं बोलतात. तर अनेकांनी ताबिश विदेशात गेल्याचा कयास बांधलाय. मात्र याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.

अपहरण करून खून झाल्याची आधी चर्चा

सुरूवातीला वर्धा नदीच्या पुलावरून गाडी पडून ताबिश वाहून गेल्याची वणीत जोरदार चर्चा रंगली होती. पण परिसरात रक्तानं माखलेला एक शर्ट आढळून आला. त्यामुळे त्याचं अपहरण करून गेम करण्यात आला असा कयास वर्तवण्यात आला होता. त्या दिशेनं तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकला पाचरण केलं. मात्र शर्ट असलेल्या जागेच्या पुढे काही श्वान गेलं नाही. शिवाय इतके दिवस होऊन परिसरात कोणती डेथ बॉडी देखील मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलवली. त्यामुळे वाहून जाणे, अपहरण, खून हे तर्क मागे पडले आणि ताबिश पळून गेल्याच्या चर्चेत वणीत जोर धरला. शिवाय या आधी वणीच असाच एक भिसीचालक आत्महत्येचं नाट्य रचून पळून गेल्यानं या गोष्टीला बळ मिळालं.

(हे पण वाचा: या आधीही वणीत घडली होती ताबिश सारखीच घटना)

घटनेच्या दिवशी ताबिश कारने गेला की एकटाच गेला, की त्याच्या सोबत आणखी कुणी होतं. शिवाय त्याच्या सोबत असणारे घटनेच्या दिवशी त्याच्यासोबत होते का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या व्यवसायात त्याच्यासोबत नेहमी कोण असायचं आता ते कोठे आहेत. आदी शंका कुशंका पोलीस तपासून बघत आहेत. पण सध्या पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्यानं ‘गेला ताबिश कुणीकडे’ हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.