शिंदोला: वणी तालुक्यातील कुर्ली येथे नवबाल गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी रक्तदान व आरोग्य शिबिर पार पडले. यात 64 युवकांनी रक्तदान केले. तर अनेक रुग्णांवर तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.
रक्तदान व आरोग्य शिबिराचे उद्दघाटन शिरपूरचे ठाणेदार सागर इंगोले यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. ठाणेदार इंगोले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले.
नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ. राजेंद्र नागपुरे व सहकारी, लोढा हॉस्पिटलचे अधिकारी, कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी सर्व प्रक्रिया पार पाडली. स्थानिक 54 व 10 बाहेर गावच्या युवकांनी रक्तदान केले. 250 रूग्णांची आरोग्य तपासणी केली. 110 रुग्णांवर औषधोपचार करण्यात आला. अनिल आसुटकर, दिवाकर थेरे यांच्याकडून रूग्णांना खाऊ वाटप करण्यात आला.
कुर्लीच्या नवबाल गणेश मंडळाने रक्तदान व आरोग्य शिबीराचा समाज उपयोगी उपक्रम राबवून गणेशोत्सवाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांपुढे एक नवा आदर्श ठेवला. असे मत ठाणेदार इंगोले व्यक्त केले.
(वणी नगर पालिकेचा अजब कारभार, पाणी तर दिलं मात्र खराब केले रस्ते)
पं. स. सदस्य संजय निखाडे यांनी शिबिराला भेट देऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वामन उरकुडे, अमित गाताडे, निलेश उरकुडे, प्रशांत पिदूरकर, महेश उरकुडे, संकेत बांदूरकार, अविनाश बांदूरकार, कैलाश ठाकरे, लहू ढेंगळे, अविनाश देरकर, संतोष ढेंगळे, पुरुषोत्तम वडुले, विकास भोस्कर, अक्षय ढेंगळे, राहुल जुनगरी, धनराज मडावी, कार्तिक पाचभाई आणि जि. प. शाळेच्या शिक्षकानी सहकार्य केले.