खोदलेले खड्डे बुजवण्यास नगर परिषद उदासीन

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खोदले होते रस्ते

0

विवेक तोटेवार, वणी: परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून नगर परिषदेद्वारे प्रगती नगर या ठिकाणी पाण्याची टाकी उभारून त्याला भूमिगत पाईपलाईन जोडण्यात आली. यामुळे वणीतील विठ्ठल वाडी, प्रगती नगर या ठिकाणी पाणी टंचाईवर मात करण्यास नगर परिषदेला यश मिळाले.

पाण्याचा प्रश्न निकालात काढीत असताना भूमिगत पाईपलाईनसाठी रस्ते फोडण्यात आले. मात्र ते दुरुस्त करण्यात नगर परिषद उदासीन दिसून येत आहे. टिळक चौक परिसरातील सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतो. बनविलेला रस्ता फोडल्यानंतर तो दुरुस्त करण्याची पूर्ण जबाबदारी नगर परिषदेची आहे. पण ही जबाबदारी स्वीकारण्यास नगर परिषद तयार असल्याचे दिसून येत नाही.

(शेलू (खुर्द) येथे वीज पडून दोन जनावरं ठार)

दिवसेंदिवस हा खड्डा मोठा होत असून या ठिकाणी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे वणीतील हा मुख्य मार्ग असून अत्यंत रहदारीचा मार्ग आहे. सहाजिकच या ठिकाणाहून नगराध्यक्षा सोबतच नगरसेवक ही रोज ये-जा करतात. पण त्यांनाही ही समस्या दिसून येत नाही काय? असा प्रश्न वणीकर जनतेला पडतो आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात पाणीप्रश्न सोडवण्यात पालिका यशस्वी ठरली पण खड्डे बुजवण्यात मात्र अपयशी ठरली..

Leave A Reply

Your email address will not be published.