दांडगाव शाळेत शिक्षिकेच्या पुढाकारानं वृक्षारोपण
पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेत वृक्षारोपण
वणी: मारेगाव तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा दांडगाव येथे वृक्षारोपण करण्यात आलं आहे. नुकत्याच रुजू झालेल्या कु. रोहिणी मोहितकर या शिक्षिकेनं शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिसरात रोपटे लावलं आहेत. शासनाच्या सध्या चार कोटी वृक्षलागवड या अभियाना अंतर्गत हे वृक्षारोपण करण्यात आलं आहे.
याधी रोहिणी मोहितकर यांनी तालुक्यातील धामणी येथील शाळेत वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले होते. दांडगाव शाळेत जवळपास ४० विद्यार्थ्यांचा भार असतांना देखील त्यांनी पुढाकार घेऊन शासकीय अभियान राबविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ झाडं लावणं हेच काम महत्त्वाचं नाही तर त्याचं संगोपण करून लावलेले झाडं जगवणं हे देखील गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया रोहिणी त्यांनी ‘वणीबहुगुणी’ला दिली.
वृक्षरोपणाच्या कार्यात त्यांना शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांनी यांच्या सहकार्यातून हे वृक्षारोपण करण्यात आलं आहे. दांडगाव येथील शाळा द्विशिक्षकी आहे. मात्र शाळेत त्या सध्या एकट्याच आहे. एक शिक्षिकाच नाही तर पर्यावरणप्रेमी म्हणूनही त्या ओळखल्या जातात.